Court|Sakinaka Rape Case Team Lokshahi
महाराष्ट्र

Sakinaka Rape Case : साकीनाका बलात्कार प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा

बलात्कार प्रकरणी आरोपी आरोपीला फाशीची शिक्षा

Published by : Team Lokshahi

मुंबईतील साकीनाका बलात्कार प्रकरणातील (Sakinaka rape case) आरोपीला आज न्यायालयाने शिक्षा सुनावली. आरोपीला दिंडोशी सत्र न्यायालयाने (Dindoshi Sessions Court) फाशीची शिक्षा दिली. मोहन चौहान असे आरोपीचे नाव आहे. हे प्रकरण फास्टट्रॅकवर चालवण्यात आले होते. हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ असल्याचं सांगत सरकारतर्फे आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. (Mumbai Police seeks death sentence for Sakinaka rape-murder accused)

आरोपीने मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात एका महिलेवर बलात्कार करून तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई घातली होती. पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या प्रकरणात मोहन चौहानला अटक करण्यात आली होती. त्याने महिलेवर बलात्कार करून पळ काढला होता. सीसीटीव्हीच्या माध्यमातून मुंबई पोलिसांनी त्याला पकडले. 18 दिवसांत मुंबई पोलिसांकडून याप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं.

नेमके प्रकरण काय?

साकीनाका परिसरात एका 32 वर्षीय महिलेवर बलात्कार झाला. साकीनाकाच्या खैरानी रोड परिसरात ही धक्कादायक घटना 9 सप्टेंबर 2021च्या रात्री घडली. आरोपीने बलात्कारानंतर पीडितेच्या गुप्तांगात लोखंडी सळई टाकण्याचं अमानुष कृत्य केलं. घटनेतील मुख्य आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर इतर आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

आरोपीकडून कोर्टात गोंधळ?

साकीनाका बलात्कार प्रकरणातील दोषी मोहन चौहान हा ड्रायव्हरचं काम करायचा. तो आता 45 वर्षांचा आहे. बुधवारी जेव्हा शिक्षेची मागणी करण्यात आली, तेव्हा मोहन कोर्टरुममध्येच आरडाओरडा करु लागला. त्यामुले न्यायाधीशांनी आरोपीला बाहेर पाठवले. इतकंच काय तर आरोपीची कोर्टरुममधील बेशिस्त वागणूक पाहून सरकारी वकिलांनी आरोपीत सुधारणा होणार नसल्याचे सांगितले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा