महाराष्ट्र

Mumbai : मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात; पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता

मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सखल भागामध्ये पाणी साचायला सुरूवात झाली आहे. पुढील 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

रात्रभर पावसानं मुंबईसह उपनगराला झोडपलं. आता काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस कोसळणार असल्याची शक्यता असून वाऱ्याचा वेग ही वाढण्याची शक्यता आहे.

वारे ताशी 60 ते 70 किलोमीटर वेगाने वाहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याचा वर्तवला आहे. नागरिकांना घराबाहेर पडताना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आले असून काही तासात पावसाच्या जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Pune : पुण्यातील कोथरूड गोळीबार प्रकरणातील पाच आरोपींना अटक

Asia Cup : भारत-पाकिस्तान सुपर-4 मध्ये पुन्हा आमनेसामने

Latest Marathi News Update live : राज्यात आज ॲलोपॅथी डॉक्टरांचा संप

EVM : आता ईव्हीएम मशीनवर दिसणार रंगीत छायाचित्र; केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय