महाराष्ट्र

Mumbai Sakinaka Rape : प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा; नराधमांना फाशीच व्हावी

Published by : Lokshahi News

मुंबईतील साकीनाका बलात्कार प्रकरण अत्यंत निंदनीय आणि धक्कादायक आहे. या प्रकरणातील आरोपींना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसंच हे संपूर्ण प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावं अशी मागणीही त्यांनी केली.

मन सुन्न करणारी ही घटना आहे. फास्ट्र ट्रॅक कोर्टात केस चालवा, नराधमांना फाशी झाली पाहिजे, असंही ते म्हणाले. राज्यात नियमबाह्य पद्धतीनं पोलिसांच्या बदल्या झाल्या असा आरोपही त्यांनी केला.
दिशा कायद्यासाठी बैठका सुरूच आहेत कृती होत नाही, असा आरोपही फडणवीस यांनी लगावला आहे.

काय प्रकरण?
मुंबईत 32 वर्षीय महिलेवर बलात्कार करुन तिच्या गुप्तांगात लोखंडी रॉड घालण्यात आल्याची धक्कादायक घटना 10 सप्टेंबरला घडली आहे. साकीनाकाच्या खैरानी रोड परिसरात ही धक्कादायक घटना 9 सप्टेंबरच्या रात्री घडली. दिल्लीत २०१२ साली घडलेल्या 'निर्भया' प्रकरणाची आठवण देणारी क्रूर घटना आहे. जखमी अवस्थेत महिलेला उपचारासाठी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र मृत्यूशी तिची झुंज अपयशी ठरली आहे. या घटनेतील मुख्य आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर इतर आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. या घटनेवरुन संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त होत असून पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा