महाराष्ट्र

Mumbai Sakinaka Rape : आरोपींना कठोर शिक्षा करणार – गृहमंत्री

Published by : Lokshahi News

'साकीनाका बलात्कार प्रकरणातील पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा केली जाईल. पोलीस खात्याला सूचना दिल्या आहेत, की या प्रकरणात आणखी कोण सहभागी आहेत का ते शोधा म्हणून. वेळोवेळी मी या प्रकरणाची सर्व माहिती घेत आहे', असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे.

साकीनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये खैरानी रोड येथे रात्री तीनच्या दरम्यान एका महिलेला मारहाण होत असल्याची तक्रार पोलीस कंट्रोलला मिळाली होती. त्यानुसार साकीनाका पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचल्यानंतर जखमी महिलेला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्या गुप्तांगात लोखंडी सळी टाकण्यात आल्याने ती गंभीररित्या जखमी असून तिची प्रकृती चिंताजनक आहे, असा अहवाल यावेळी डॉक्टरांनी पोलिसांना दिला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात