Mumbai Weather 
महाराष्ट्र

Mumbai Weather: मुंबईत गुलाबी थंडीची चाहूल! वाढत्या वायू प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम

Winter Season: मुंबईत गुलाबी थंडी जाणवू लागली असली तरी वाढत्या वायू प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत.

Published by : Dhanshree Shintre

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

मुंबईकर गुलाबी थंडी अनुभवत असताना वाढत्या वायू प्रदूषणामुळे आजारी पडू लागले आहेत. शहर आणि उपनगरांमधील हवा आरोग्यास हानिकारक ठरत असल्याने आरोग्यावर त्याचा परिणाम होत आहे.

हवेतील प्रदूषण वाढल्याने श्वसनाचा त्रास, खोकला, अ‍ॅलर्जी आणि डोळ्यांची जळजळ आदी समस्या मुंबईकरांना जाणवू लागल्या आहेत. मुंबईतील सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक 165 ते 170 इतका आहे. तर 150 ते 200 मधील एक्यूआयचे प्रमाण म्हणजे हवा आरोग्यास घातक अशी प्रदूषणाची पातळी मोजली जाते.

मुंबईत सुरू असलेल्या इमारती, रस्ते, पूल आणि मेट्रोंच्या कामांमुळे धुळीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे याचा परिणाम थेट आरोग्यावर होत आहे. तर महापालिकेने या नियंत्रण आणणे गरजेचे असल्याचं नागरिकांच म्हणणं आहे.

  • मुंबईत थंडीची चाहूल लागली असली तरी वायू प्रदूषण मोठी समस्या बनली आहे.

  • AQI 165–170 असून ही पातळी आरोग्यास हानिकारक मानली जाते.

  • श्वसन त्रास, अ‍ॅलर्जी, खोकला आणि डोळ्यांची जळजळ अशा तक्रारींमध्ये वाढ.

  • शहरातील बांधकाम, रस्ते आणि मेट्रो प्रकल्पांमुळे धुळीचे प्रदूषण वाढले आहे.

  • नागरिकांनी प्रदूषण नियंत्रणासाठी तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा