महाराष्ट्र

मुंबईकरांनो काळजी घ्या! मुंबईत 'JN 1' चा शिरकाव

Published by : Team Lokshahi

कोरोनाचा नवीन उपप्रकार JN 1चा मुंबईतही शिरकाव झाला आहे. आतापर्यंत 22 रुग्णांना याची लागण झाली आहे, तर राज्यात JN 1च्या रुग्णांची संख्या सध्या 250 वर पोहचली आहे. सर्व स्त्रण जिनोम सिक्वेन्सिंगमध्ये आढळून आले आहेत. 22 पैकी दोन नमुने मुंबईबाहेरील असून एक सॅम्पल डुप्लिकेट असल्याचे सांगण्यात आले. उर्वरित 19 रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे असून त्यातील दोघे जण सहव्याधी असलेले आहेत.

बहुतांश स्रणांची तपासणी खासगी लॅबमध्ये करण्यात आली. 19 पैकी 8 महिला आणि 11 पुरुष असल्याचे सांगण्यात आले. राज्यातील 'JN 1' व्हेरिएंटची रुग्णसंख्या तब्बल 250 वर पोहचली असून सोमवारी दिवसभरात 111 रुग्णांची नोंद करण्यात आली. राज्यात सध्या 882 सक्रिय रुग्ण आहेत. रविवारपर्यंत 139 रुग्णांची नोंद करण्यात आली होती. 111 पैकी 22 रुग्णांची नोंद मुंबईतून झाली आहे. सोमवारी पुणे जिल्ह्यात 150, नागपूर 30, मुंबई 22, सोलापूर 9, सांगली 7, ठाणे 7, जळगाव 4, नगर, बीड प्रत्येकी 3 आणि छत्रपती संभाजीनगर, नांदेड, कोल्हापूर, नाशिक आणि धाराशिवय प्रत्येकी 2, अकोला, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि यवतमाळ जिल्ह्यात प्रत्येकी 1 अशी 'JN 1'च्या रुग्णांची नोंद झाली.

दरम्यान, कोरोनाच्या नवीन JN.1 व्हेरियंटचे दोन गंभीर परिणाम होऊ शकतात. पहिलं म्हणजे कोरोना महामारीविरुद्धचा लढा आपल्याला संपवता येणार नसून हा लढा आपल्याचा दीर्घकाळ सुरू ठेवावा लागेल. तर, दुसरा परिणाम म्हणजे JN.1 व्हेरियंटचा प्रसार भविष्यात निर्माण होणाऱ्या संभाव्य धोकादायक नवीन कोविड व्हेरियंटसाठी अनुकूल वातावरण तयार करू शकतो आणि हे मानवासाठी घातक ठरू शकतं.

घाटकोपरच्या होर्डिंग दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत, दोषींवर कारवाई करण्यासाठी CM शिंदेंनी दिल्या सूचना

T20 वर्ल्डकपनंतर रोहित शर्मा घेणार निवृत्ती? हार्दिक पंड्याच्या निवडीबाबत मोठी अपडेट आली समोर

दिनविशेष 14 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

मुंबई, ठाणे, रायगडला अवकाळी पावसानं झोडपलं! वादळी वाऱ्यामुळं घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळलं, ४ जणांचा मृत्यू

"राहुल गांधी तुम्ही पाकिस्तानला घाबरा पण आम्ही भाजपवाले आहोत", पालघरमध्ये अमित शहांचा इंडिया आघाडीवर घणाघात