Megablocks on all three railway lines on Sunday Team Lokshahi
महाराष्ट्र

Railway Megablock : मुंबईकरांनो, आज तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

पश्चिम रेल्वे मार्गावर रात्री जंम्बो ब्लॉक

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वे या तीनही मार्गांवर आज मेगाब्लॉक (Megablock) घेण्यात आला आहे. रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावर वसई रोड ते भाईंदर दरम्यान रात्री जंम्बो ब्लॉक असणार आहे.

मध्य रेल्वे मार्ग

सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाऊन फास्ट मार्गावर रविवारी सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 पर्यंत मेगाब्लॉक असले. तर, या वेळेतील अप आणि डाउन जलद मार्गावरील लोकल फेऱ्या धीम्या मार्गावर सुरु असतील.

हार्बर मार्ग

सीएसएमटी चुनाभट्टी, वांद्रे हार्बर डाऊन मार्गावर रविवारी सकाळी 11.40 ते सायंकाळी 4.40 पर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे- सीएसएमटी अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.

पश्चिम रेल्वे

वसई ते भाईंदर स्थानकादरम्यान अप-डाऊन जलद मार्गावर आणि वांद्रे ते माहिमदरम्यान रविवारी रात्री 12.30 ते पहाटे 4 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा