MCGM ( mumbai )
MCGM ( mumbai ) Team Lokshahi
महाराष्ट्र

Save Soil Movement : 'माती वाचवा' मोहीमेला मुंबईच्या MCGM मुख्यालयाचा पाठिंबा

Published by : Team Lokshahi

मुंबई (mumbai) :

महाराष्ट्रातील युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईट्समध्ये नोंद असणाऱ्या आयकॉनिक बृहन्मुंबई महानगरपालिका (MCGM) चे मुख्यालय निळ्या आणि हिरव्या रंगांच्या रोशनाईने उजाळले. माती वाचवा मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी हा उपक्रम झाला.

MCGM

ईशा फाऊंडेशन ( ISHA FOUNDATION) आणि माती वाचवा मोहिमेचे संस्थापक सद्गुरू, १२ जून रोजी मुंबईतल्या बीकेसी ( BKC) येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये सायंकाळी ७:०० वाजता सार्वजनिक कार्यक्रमामध्ये माती नष्ट होण्याबद्दल बोलणार आहेत. ह्या कार्यक्रमासाठी नोंदणी सध्या ‘माती वाचवा’ वेबसाइट वर सुरू आहे. सद्गुरू मुंबईतील लोकांना संबोधित करून, एक पिढी म्हणून मानवतेचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी उभे राहण्याचा, आणि मातीला इतर सर्व पर्यावरणीय समस्यांपेक्षा वेगळा एक “एक केंद्रित अजेंडा” बनविण्यास एकत्र येण्याचा संदेश देतील अशी अपेक्षा आहे.

आठवड्याच्या सुरुवातीला हेलेना गुआलिंगा, डॉ. दीपक चोप्रा आणि सद्गुरू जागतिक आर्थिक मंच (World Economic Forum) मध्ये झालेल्या 'शहरांचे भविष्य' नावाच्या कार्यक्रमात, जागतिक आव्हाने, उपाय आणि आपल्याला चांगल्या भविष्याकडे घेऊन जाण्यासाठीचे आवश्यक नेतृत्व यावर चर्चा करण्यासाठी दावोस मध्ये एकत्रित आले होते.

MCGM

गेल्या शतकात मानवाने केलेले मातीचे शोषण आणि जर आपण आत्ता कृती केली, तर मातीचा ऱ्हास कसा रोखता येईल याबद्दलही ते बोलले. १०,००० लोक निसर्गाशी सुसंगत जगू शकतील अशा एका इमारतीच्या शहराची कल्पनाही त्यांनी व्यक्त केली.

आमदार, युवा सेनेचे अध्यक्ष, आणि महाराष्ट्र सरकारचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री (Minister of Environment), श्री आदित्य ठाकरे, जे दावोस कार्यक्रमाला उपस्थित होते, त्यांनी सद्गुरूंसोबतचा त्यांचा फोटो ट्विट केला. मा. मंत्री यांनी ट्विट मध्ये लिहिले, “@wef येथे असताना दावोसमध्ये आणखी एक विशेष भेट. त्यांचे आशीर्वाद घेण्याव्यतिरिक्त, मला श्री @SadhguruJV जी यांच्यासोबत शहरे आणि शाश्वत विकासावर थोडक्यात चर्चा करण्याची संधीही मिळाली.”

याआधीही युनायटेड स्टेट्स ( UNITED STATES) आणि कॅनडामधील आयकॉनिक नायगारा फॉल्स (Niagara Falls), जिनिव्हामधील नेत्रदीपक जेट डी'एउ कारंजे आणि मॉन्ट्रियल ऑलिम्पिक स्टेडियम यांनी निळ्या आणि हिरव्या रंगांमध्ये उजळून माती वाचवा मोहिमेला पाठिंबा दर्शविला.

मुंबईत येण्यापूर्वी सद्गुरूं भोपाळ, जयपूर, लखनौ आणि नवी दिल्ली(DELHI) येथे सेव्ह सॉईल कार्यक्रम आयोजित करतील, जिथे ते विविध मंत्र्यांना भेटतील. हा 100 दिवसांचा प्रवास जूनच्या अखेरीस कोईम्बतूर येथील ईशा योग केंद्रात संपेल.

MCGM

कॉन्शियस प्लॅनेट (Concious Planet) : माती वाचवा, ही माती आणि ही धरती वाचविण्यासाठी एक सजग दृष्टीकोणाची प्रेरणा देणारी जागतिक मोहीम आहे. ही पहिली आणि अग्रगण्य अशी लोक मोहीम आहे. जगातील ३.५ अब्ज लोकांचा पाठींबा मिळवून (जगात मतदानाचा अधिकार असणाऱ्या ६०% लोकसंख्येपेक्षा जास्त) जगभरातल्या शासनांना मातीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आणि मातीचा ऱ्हास थांबवण्यासाठी धोरणात्मक बदल करण्यासाठी प्रेरित करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. जागतिक नेते, प्रभावशाली व्यक्ती, कलाकार, शेतकरी, तज्ञ, आध्यात्मिक नेते, NGOs आणि सामान्य जनता, हे पुढे येऊन माती सोबत मानवतेचा संबंध पुनर्स्थापित करण्यासाठी या मोहिमेला पाठींबा देत आहेत.

"पहिल्या चार टप्प्यातच आम्ही महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचा सुफडा साफ केला "; उपमुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा दावा

मोठी बातमी! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडेला उदयपूरमधून अटक

World Hypertension Day 2024 : 'जागतिक उच्च रक्तदाब दिवस' कधी आणि का साजरा केला जातो?

"४ तारखेनंतर टरबूजचा भाव उतरणार आहे"; उद्धव ठाकरेंची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर घणाघाती टीका

Daily Horoscope 17 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांना साडेसातीचाही होणार त्रास; पाहा तुमचे भविष्य