थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Pune) मुंढवा येथील ४० एकर जमिनीच्या व्यवहार प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवारांचे नाव आल्यानंतर अजित पवार यांनी जमिनीचे व्यवहार रद्द करत असल्याचे जाहीर केले. या जमीन घोटाळा प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली आहे.
या जमीन व्यवहार प्रकरणात अनेक खुलासे समोर येत असून यातच आता पुण्यातील मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणात शितल तेजवानीला म्हणणे मांडण्यासाठी खरगे समितीकडून मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
सलग दुसऱ्यांदा शितल तेजवानी खारगे चौकशी समितीच्या समोर गैरहजर राहिल्या. वकिलामार्फत बाजू मांडण्यासाठी आठ दिवसांची मुदत मागितली होती,त्यानंतर खारगे समितीने चार डिसेंबरला बाजू मांडण्याची मुदत देण्यात आली आहे.
Summery
पुण्यातील मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण
शितल तेजवानीला म्हणणे मांडण्यासाठी खरगे समितीकडून मुदतवाढ
खरगे समितीकडून 4 डिसेंबरपर्यंत बाजू मांडण्यासाठी मुदतवाढ