महाराष्ट्र

‘कोणतीही लक्षण नसली तरीही कोरोनाची चाचणी करा’

Published by : Lokshahi News

कोणतीही लक्षण नसली तरीही कोरोनाची चाचणी करा असे आदेश महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील खासगी दवाखान्यांना दिले होते,कोणताही ताप असला तरी, करोनाची चाचणी करा असे आदेश महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील खासगी दवाखान्यांना दिले होते, परंतु या दवाखान्यांनी आदेशाला घरचा रस्ता दाखवला आहे. त्यामुळे या दवाखान्यांना दुसऱ्यांदा आदेश बजावण्यात येणार आहेत. पालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी ही माहिती दिली.

मलेरिया, डेंगू, काविळीच्या साथीने डोके वर काढले आहे. या आजाराच्या रुग्णांची संख्या रोज वाढतच आहे. मलेरिया, डेंगूच्या रुग्णांना सर्दी-ताप अशी लक्षणे असतात. हीच लक्षणे कोरोना आजाराची देखील आहेत. त्यामुळे ताप असलेला रुग्ण खासगी रुग्णालयात उपचारासाठी आला तर त्याची करोना चाचणी करा असे आदेश महापालिकेने शहरातील खासगी रुग्णालयांना दिले होते.

कोरोना चाचणीचे किटस् महापालिका उपलब्ध करुन देईल असेदेखील पालिकेने दवाखान्यांना कळविले होते, परंतु खासगी दवाखान्यांनी पालिकेच्या आदेशाकडे दुर्लक्ष केले. ताप आलेल्या रुग्णांची खासगी दवाखान्यात करोना चाचणी केली जात नाही, त्यामुळे संबंधित रुग्णाला कोरोनाची लागण झाली आहे की नाही हे स्पष्ट होत नाही.

खासगी रुग्णालयांना पुन्हा एक पत्र पाठवले जाणार आहे व ताप असलेल्या सर्व रुग्णांची कोरोना चाचणी करण्याचे आदेश दिले जाणार आहेत. या आदेशाचे पालन होते की, नाही हे पाहून पुढील निर्णय घेतला जाईल, असे अधिकारी डॉ. पारस मंडले यांनी सांगितले

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : काल एक गद्दार काल बोलला 'जय गुजरात' - उद्धव ठाकरे

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : "मराठी शिकणारे शिक्षणमंत्री इंग्रजीमध्ये शिकणारे मुख्यमंत्री..." राज ठाकरेंचा नाव न घेता टोला

Raj Thackeray Live : 'जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलंय'; राज ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला

Raj-Uddhav Thackeray Family Member Vijayi Melava : सहकुटुंब सहपरिवार..; ठाकरे बंधूंचे कुटुंब एकाच व्यासपीठावर