थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Mahapalika Election Prachar) महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहे. येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.
अनेक पक्ष जोरदार प्रचाराला लागले असून सभा, रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. सभांचा धडाका सुरू असल्याचे पाहायला मिळत असून मुलाखती घेतल्या जात आहेत. यातच आता महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत.
आज संध्याकाळी 5.30 वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार असून 15 तारखेला मतदान आणि 16 तारखेला मतमोजणी होणार आहे. जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी नेत्यांच्या सभांचे आयोजन करण्यात येत आहे. अखेरच्या टप्प्यात आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरूच राहणार असल्याचे पाहायला मिळणार आहे.
Summary
पालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार
15 जानेवारीला मतदान असून 16 जानेवारीला मतमोजणी होणार
आज संध्याकाळी सर्व प्रचारांच्या तोफा थंडावणार