थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
( Maharashtra Municipal Elections) आगामी महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.
30 डिसेंबरपर्यंत महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांना आपले उमेदवारी अर्ज दाखल करता येणार होते. काल 31 डिसेंबरला उमेदवारांच्या अर्जाची छाननी करण्यात आली. काल अनेक उमेदवारांनी अर्ज मागे घेतले.
29 महापालिकांची निवडणूक अर्ज मागे घेण्याची मुदत आता संपली असून आज निवडणूक चिन्हं आणि अंतिम उमेदवार यादी जाहीर केली जाणार आहे. आजपासून उमेदवारांच्या प्रचार फेरी, सभांना सुरुवात होईल. अनेक ठिकाणी स्थानिक नेते आणि प्रमुख नेत्यांच्या सभा होतील. तेथे नेते एकमेकांवर आरोपांची प्रत्यारोप होताना पाहायला मिळणार आहे.
Summary
29 महापालिकांची निवडणूक अर्ज मागे घेण्याची मुदत संपली
आज निवडणूक चिन्हं आणि अंतिम उमेदवार यादी जाहीर केली जाईल
उमेदवारांच्या प्रचार फेरी, सभांना सुरुवात