महाराष्ट्र

लाच घेताना जळगाव महापालिकेचा नगर रचना सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात!

जळगाव महापालिकेतील नगर रचना सहाय्यक मनोज वन्नेरे यांना 15 हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले, महापालिकेत खळबळ.

Published by : shweta walge

मोठी बातमी समोर आली आहे. जळगाव महापालिकेतील नगर रचना सहाय्यक मनोज समाधान वन्नेरे यास आज जळगाव एसीबीने 15 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.

तक्रारदार यांच्या बांधकामाचे परवानगीचे व बांधकाम झालेल्या घराच्या भोगवटा प्रमाणपत्र देण्याचे प्रकरण मंजूर करण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती. सुरुवातीला तीस हजार रुपये मागण्यात आले. नंतर तडजोडीनंतर मनोज वन्नेरे यांनी पंधरा हजार स्वीकारले. एसीबीच्या या कारवाईमुळे महापालिकेचे वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वात दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, किशोर महाजन, राकेश दुसाणे आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा