महाराष्ट्र

Kalyan Lok Sabha: मोदींच्या सभेत स्टेजवर स्थान नसल्याने मुरबाड जिल्हाप्रमुख अरविंद मोरेंचा राजीनामा

मुरबाडमध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. मुरबाड जिल्हाप्रमुख अरविंद मोरेंचा राजीनामा आहे.

Published by : Dhanshree Shintre

मुरबाडमध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. मुरबाड जिल्हाप्रमुख अरविंद मोरेंचा राजीनामा आहे. मुख्यमंत्री शिंदेंकडे हा राजीनामा पाठवलेला आहे. मोदींच्या सभेत स्टेजवर स्थान नसल्याने राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. मोदींच्या सभेआधीच राजीनामानाट्य या ठिकाणी रंगताना दिसत आहे. त्यामुळे आता कल्याणच्या राजकारणात मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला आहे.

मोदींच्या सभेत मुरबाड जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांना स्टेजवर स्थान मिळालं नाही. त्यामुळे ते नाराज असल्याचं असं चर्चांना उधान आलं. या नाराजीतून अरविंद मोरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती आहे.

शहरप्रमुख, आमदार, माजी आमदारांना स्टेजवर स्थान मिळालं. पण मला मात्र जणीवपूर्वक स्टेजवरून डावलल्याचा आरोप अरविंद मोरे यांनी केला आहे. पंतप्रधान मोदींच्या आगमनापूर्वी शिवसेना जिल्हा प्रमुखाचे मानअपमानाचं नाट्य सुरू असल्याचं कल्याणमध्ये दिसत आहे. मतदानाच्या 5 दिवसांअगोदर मोरेंनी राजीनामा दिल्यामुळे शिंदे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा