थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Nagpur Leoprad CCTV Video ) नागपूरच्या भांडेवाडी परिसरात काल एक घरात बिबट्या शिरला होता. त्यानंतर अथक प्रयत्नानंतर त्या बिबट्याला रेस्क्यू करण्यात आले. यात आता बिबट्याचा त्या परिसरात वावर असल्याचे पाहायला मिळत आहे.
बिबट्याचा त्या परिसरात वावर असल्याचा एक सीसीटीव्ही समोर आला आहे. या सीसीटीव्हीत बिबट्या रात्रीच्या वेळी कुत्र्यांपासून बचाव करण्याकरिता आडोशा शोधत असल्याचं त्या सीसीटीव्हीत दिसून येत आहे.
हा बिबट्या नेमका आला कुठून याचा तपास वन विभाग आणि पोलीस करत असून परिसरातील CCTV च्या माध्यमातून शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.
Summery
नागपूरच्या भांडेवाडी परिसरात काल एका घरात बिबट्या शिरला
नागपूरमधील भांडेवाडी परिसरातील बिबट्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर
रात्रीच्या वेळी हा बिबट्या कुत्र्यांपासून बचाव करण्याकरिता आडोशा शोधण्याच्या प्रयत्नात