महाराष्ट्र

नागपूरपासून मुंबईपर्यंत पाणी प्रश्न पेटला, नागपुरात काँग्रेसचे आंदोलन

मुंबईतील खारघरमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिला इशारा

Published by : Team Lokshahi

नागपूरात पाणी प्रश्न (water)पेटला आहे. धरणात पाणी असून नागरिकांना पाणी मिळत नसल्याने काँग्रेस (congress)आक्रमक झाली आहे. पाण्याच्या मागणीसाठी काँग्रेसने आंदोलन सुरु केले असून पाण्याच्या टाकीवर नागरिक चढले आहे. नागपूर प्रमाणे मुंबईतील पनवेलमधील खारघर भागांत पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या ठिकाणी भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर (prashant thakur)आक्रमक झाले आहे.

काँग्रेस नेते गिरीश पांडव यांच्या नेतृत्त्वात काँग्रेसचं आंदोलन सुरु केले आहे. पाण्याच्या टाकीवर काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते चढले आहेत. नागपूरमधील वंजारीनगर भागात काँग्रेसचे आंदोलन सुरु असून पाण्याच्या टाकीवर चढून प्रशासनाच्या विरोधात आंदोलन सुरु केले आहे. नागपुरातील अनेक भागांत पाणीप्रश्न भीषण झाला आहे. अनेक भागात एक तास पाणी नाही . विशेष म्हणज धरणात पाणी असूनंही मनपा OCW च्या उदासीन धोरणाचा नागरिकांना फटका बसला आहे. यावेळी नितीन गडकरी यांच्या विरोधात घोषणा काँग्रेस कार्यकर्ते देत आहेत.

सिडको भवनमध्ये घुसणार

आमदार प्रशांत ठाकूर यांचा इशारा

खारघर येथील अनियमित व अपुर्‍या पाणीपुरवठ्यात ३१ मेपर्यंत सुधारणा न झाल्यास कोणतीही नोटीस न देता सिडको भवनमध्ये घुसून पाणी मिळत नाही तोपर्यंत तेथेच मुक्काम करू, असा जाहीर इशारा भारतीय जनता पक्षाचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी खारघर येथील आंदोलनप्रसंगी दिला. सिडकोने वसविलेल्या खारघरमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. खारघर मध्ये फक्त ५० टक्के पाणीपुरवठा होतो. यासाठी भाजपने सिडकोच्या प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सिडकोच्या गृहसंकुलाचे काम बंद आंदोलन करण्यात आले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा