महाराष्ट्र

नालासोपाऱ्यात पावसाने उडवली दाणादाण

Published by : Lokshahi News

सध्या मुंबईसह राज्यभरात मान्सुनचं आगमन झालं आहे. विविध ठिकाणी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. नालासोपाऱ्यातही जोरदार पावसानं दाणादाण उडाली. नालासोपारा पूर्व ते पेल्हार फाटा या मुख्य रस्त्यावर जवळपास २ फुटांचे खड्डे पडले आहेत.

परिसरातील नागरिकांचं हाल होत आहेत. खड्ड्यात पाणी साचल्यानं वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. पावसाच्या पाण्यामुळे रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यानं दुचाकीचालकांचे अपघातदेखील होत आहेत.

पेल्हार फाटा, धानीव बाग, वाकणपाडा, बिलालपाडा या परिसरात मुख्य रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलं आहे. वसई-विरार महापालिकेने तत्काळ खड्डे बुजवून नागरिक वाहनधारकांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Pappu Yadav Challenges Raj Thackeray : "ही गुंडगिरी थांबवली नाही तर..."; पप्पू यादवची राज ठाकरेंना धमकी

Latest Marathi News Update live : त्रिभाषा सूत्र विरोधात शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समिती आक्रमक

Baby Trafficking Pune : पुण्यात गुन्हेगारीचा सापळा; 40 दिवसांच्या बालकाची विक्री, 6 आरोपी अटकेत

Dhurandhar Movie Teaser Out : रणवीर सिंगचा रावडी लूक; 'धुरंधर'च्या टीझरनं वाढवली चाहत्यांची उत्सुकता