महाराष्ट्र

Nandurbar : पादचाऱ्याला रिक्षाची धडक; 58 वर्षीय व्यक्तीचा जागी मृत्यू

रिक्षा अंगावरून गेल्याने डोक्याला आणि हाता पायाला मोठ्या प्रमाणात मार लागल्याने 58 वर्षीय व्यक्तीचा जागी मृत्यू.

Published by : Team Lokshahi

नंदुरबार: नंदुरबार जिल्ह्यातील विसरवाडीत भरधाव वेगाने येणाऱ्या रिक्षाने एका पादचाऱ्याला जोरदार धडक दिल्याने एका 58 वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आपल्या वैयक्तिक कामासाठी रस्त्याने जात असलेल्या विक्रम गावित या 58 वर्षीय व्यक्तीला बेशिस्त पद्धतीने रिक्षा चालकाने मागून जोरदार धडक दिली. या धडकेत संबंधित व्यक्तीच्या डोक्याला मोठ्या प्रमाणात जखमा झाल्याने या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे.

घटनेची माहिती मिळताच विसरवाडी पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपघातात मृत झालेल्या व्यक्तीस विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून घटनेची माहिती मिळताच मृत व्यक्तीचा नातेवाईकांनी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात गर्दी केली आहे. धडक देणाऱ्या रिक्षा चालकाविरोधात विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray : मराठीच्या वाकड्यात जाणाऱ्यांवर राज ठाकरे कडाडले, जाणून घ्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

Chandrashekhar Bawankule On Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : "खरा अजेंडा ‘म’ म्हणजे ‘मराठी’ नाही, तर..." ; विजय मेळाव्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया

Sanjay Rauat : "हे सरकार म्हणजे हवा भरलेले फुगे"; विजयी मेळाव्यानंतर राऊतांची पहिली प्रतिक्रिया

Uddhav Thackeray on Devendra Fadanvis : आंतरपाट दूर करणारे अनाजी पंत म्हणत उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर थेट निशाणा