महाराष्ट्र

नंदुरबार जिल्हा पोलिसांची मोठी कारवाई; निवडणुकीच्या पार्श्भूमीवर केल्या २० तलवारी जप्त

Published by : Lokshahi News

प्रशांत जव्हेरी, नंदुरबार | नंदुरबार जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्भूमीवर जिल्हा पोलीस दलाने ऑल आउट मोहीम राबवत 20 तलवारी जप्त केल्या. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे. तसेच इतका मोठा शस्त्र साठा नेमका कुठे जात होता याची चौकशी पोलीस करीत आहे.

नंदुरबार जिल्हा परिषदेच्या 11 गट आणि पंचायत समितीच्या 14 जणांसाठी उद्या मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्भूमीवर पोलीस विभागाच्या वतीने मोठ्या प्रमाणात नाका बंदी लावण्यात येऊन जिल्हा भरात ऑल आउट मोहीम राबविण्यात आली. यावेळी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने कारवाई करत धडगाव शहरात संशयितरित्या फिरणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली. त्याच्याकडून 20 तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत.या इसमाची चौकशी करण्यात येत आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्भूमीवर ही कारवाई करण्यात आल्याने एकच खळबळ माजली आहे पोलीस इतका मोठा शस्त्र साठा कुठे जात होता याची चौकशी करत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा