महाराष्ट्र

शिवसेनेनंतर आता भाजपकडून शुद्धीकरण…

Published by : Lokshahi News

मंगेश जोशी | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केल्यानंतर शिवसेनेने स्मृतीस्थळाचे दुधाने शुद्धीकरण केले होते. या शुद्धीकरणातून राणेंना डिवचण्याचा शिवसेनाचा प्रयत्न होता. आता यानंतर भाजपकडून शुद्धीकरण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये भाजपकडून शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला.

नारायण राणे यांनी जन आशीर्वाद यात्रेपुर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्क वरील स्मृतीस्थळाला भेट देत अभिवादन केले होते. यानंतर जन आशीर्वाद यात्रेत जनतेला संबोधित करताना त्यांनी शिवसेनेवर टीकेची तोफ डागली होती. यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाचं आधी दुग्धाभिषेक, त्यानंतर गोमूत्राने हे शुद्धीकरण करण्यात आले.

या सर्व घडामोडीनंतर नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कानशिलात लगावल्याचे विधान केले होते.या विधानानंतर राज्यभरात शिवसेना आक्रमक झाली होती. राणेंच्या पोस्टरला काळे फासण्यापासून, पुतळा जाळणे व भाजप कार्यालयात कोंबड्या सोडण्याचे आंदोलन करण्यात आले होते.

यानंतर दोन्ही पक्षातला वाद निवळतो असे वाटत असताना आता जळगावमध्ये भाजपकडून शुद्धीकरण करण्यात आले. जळगाव येथे शिवसैनिकांनी भाजपा कार्यालयावर कोंबड्या फेकून निदर्शने केली होती. दरम्यान आज जळगाव येथील भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयात होम हवन पूजा करून कार्यालयाचे शुद्धीकरण करत भाजपने शिवसेनेचा निषेध व्यक्त केला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mediclaim : विमा कंपन्यांकडून आरोग्य विमा क्लेमसाठी 24 तासांची अट शिथिल

Ajit Doval : 'तुमच्याकडे भारतात झालेल्या नुकसानीचा एकतरी फोटो आहे का?'; अजित डोवाल यांचे विदेशी माध्यमांना खुले आव्हान

Latest Marathi News Update live : विधान परिषदेत जनसुरक्षा विधेयकावरून गदारोळ

KL Rahul : कर्णधार आणि उपकर्णधार अनुपस्थितीत केएल राहुलकडे टीम इंडियाची धुरा