Narayan Rane Team Lokshahi
महाराष्ट्र

कलमे चुकीची लावल्याने नारायण राणे यांना अटकपुर्व जामीन मंजूर

Narayan Rane धुळे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी केला होता अर्ज

Published by : Team Lokshahi

धुळे

महाड येथील पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी धुळ्यात (Dhule)भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या विरोधात शिवसैनिकांकडून (Shiv Sena) गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या प्रकरणात आज जिल्हा व सत्र न्यायधीश आर एच मोहंमद यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक पूर्व जामीन मंजूर केले आहे.

नारायण राणे यांनी धुळे सत्र न्यायालयात ४ मे रोजी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. या प्रकरणात आज नारायण राणे यांना दिलासा देत अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. अनिकेत निकम म्हणाले की, मंत्री नारायण राणे यांच्याविरुद्ध लावलेली कलमे सकृतदर्शनी चुकीची आणि बेकायदेशीर आहेत, असे आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. याचे कारण म्हणजे नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे कोणत्याही समाजात तेढ निर्माण झालेली नाही किंवा समाजिक शांततेचा भंग देखील झालेला नाही. गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी नारायण राणे यांना चौकशीसाठी देखील बोलावलेले नाही. परंतु आम्ही त्यांच्या अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला, तेव्हा पोलिसांनी राणे यांची चौकशी करायची असल्याने त्यांचा अटकपूर्व जामिनासाठी विरोध केला. सरकारी पक्षाची ही विनंतीच चुकीची आहे आणि कायद्याला धरून नसल्याचे आम्ही न्यायालयाला सांगितले.

काय आहे प्रकरण

रायगडमधील महाड येथे आज केंद्रीयमंत्री राणेंची जन आशीर्वाद यात्रा पोहचली होती. यावेळी पत्रकारांशी बोलताना राणेंकडून असं खळबळजनक विधान करण्यात आलं आहे. "त्या दिवशी नाही का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून… अरे हिरक मोहत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती." असं राणे म्हणाले आहेत. या पत्रकारपरिषदेस विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची देखील उपस्थिती होती.

मुख्यमंत्र्याच्या या विरोधातील वादग्रस्त विधानावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. महाड शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युवासेना अधिकारी सिद्धेश पाटेकर यांनी फिर्याद दिली आहे. भादंवि कलम 153, 189, 504, 505(2) आणि 506 प्रमाणे गुन्हा दाखल. यावेळी महाड शहरचे पोलिस निरीक्षक शैलेश सणस यांच्याकडे तपास दिला आहे. जिल्हा सरचिटणीस बिपीन म्हामुणकर, जिल्हा उपाध्यक्ष अक्षय ताडफळे, महाड तालुका अध्यक्ष जयवंत दळवी यांच्यासह शंभर ते सव्वाशे जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा