Narayan Rane  Team Lokshahi
महाराष्ट्र

Narayan Rane : नारायण राणेंच्या अडचणीत वाढ, CRZ कायदाचे उल्लंघन केल्याप्रकरणी नोटीस

मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी राणेंना नोटीस बजावली आहे.

Published by : Shweta Chavan-Zagade

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या अडचणीमध्ये आता आणखी वाढ झाली आहे. मुंबई महापालिकेनंतर (BMC) आता मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी ( Mumbai Suburban District Collector) त्यांना नोटीस पाठवली आहे. जुहू येथील अधिश बंगला सीआरझेड उल्लंघनप्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आला असून नारायण राणेंना 10 जूनला सुनावणीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

अधिक बंगल्याला 2007 मध्ये पर्यावरण मंत्रालयाने सीआरझेड अंतर्गत एनओसी दिली होती. यातील 2 अटींचं उल्लंघन केल्याचा ठपका नारायण राणे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. एफएसआय कमी असातनाही 2.12 एफएसआय वापरला गेला, तसंच बंगल्यासाठी 2810 चौरस मीटरची बांधकाम परवानगी असताना 4272 चौरस मीटरचं बांधकाम केल्याचं या नोटिसीत म्हटलं आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्यासाठी मनसे आणि शिवसेनेचे नेते वरळी येथील डोम सभागृहात दाखल

Sandeep Deshpande : 'आवाज मराठीचा!', विजयी मेळाव्यासाठी संदीप देशपांडेंचा खास टी-शर्ट; मराठीची मुळाक्षरेही दिसताहेत उठून

Maharashtra Rain Update : राज्यात पावसाचा जोर कायम; साताऱ्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Satara School : 'या' तालुक्यातील 334 शाळांना पावसाळी सुट्टी जाहीर