थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Ajit Pawar ) पुण्यातील अनेक नेत्यांनी काल भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला. याच पार्श्वभूमीवर आता काल झालेल्या भाजपमधील पक्ष प्रवेशामूळे अजित पवार यांची राष्ट्रवादी नाराज असल्याची माहिती मिळत आहे.
एकीकडे मैत्रीपूर्ण लढणार असे सांगून ही भाजपने पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील अनेक माजी नगरसेवक आणि पदाधिकारी यांना पक्षात घेतले यावरून राष्ट्रवादीने अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही एकत्र असून पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये मैत्रीपूर्ण लढणार आहोत असे सांगूनही पक्षप्रवेश होताना पाहायला मिळत आहे.
पुण्यात आणि पिंपरी चिंचवड मधील अनेकांचे पक्ष प्रवेश केल्याने राष्ट्रवादीला धक्का दिला असून अजित पवार यांना निवडणुकीत याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध भाजप,शिवसेना अशी लढत होणार आहे.
Summery
काल झालेल्या भाजपमधील पक्ष प्रवेशामूळे अजित पवार यांची राष्ट्रवादी नाराज
भाजपने पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील अनेक माजी नगरसेवक आणि पदाधिकारी यांना पक्षात घेतले
राष्ट्रवादीने अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली आहे.