आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे मनमाड येथील अन्न महामंडळाचे (FCI) अंशतः खासगीकरण करण्यात आले असून खासगीकरणात कंत्राटदारांनी स्थानिक भूमिपुत्रांना नाकारत बाहेरील कामगारांची भरती केली आहे. त्यामुळे भूमिपुत्र आक्रमक झाले आहेत. तर अधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाची भेट नाकारल्याने संतप्त स्थानिकांनी महामंडळाच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन केले.
खासगीकरणात स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य देण्याची मागणी यावेळी करण्यात आली असून ही मागणी मान्य न झाल्यास मोठे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.