बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Navi Mumbai Airport) नवी मुंबई विमानतळ आजपासून सुरू होत आहे. आज 25 डिसेंबर 2025 रोजी पहिली व्यावसायिक विमानसेवा सुरू होत आहे. यामुळे मुंबई महानगर प्रदेशातील वाढत्या हवाई वाहतुकीवरील ताण कमी होणार आहे.
नवी मुंबई विमानतळ हे टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात येणार आहे. या विमानतळाहून पहिल्या टप्प्यात इंडिगो, एअर इंडिया, आकासा आणि स्टार एअर या विमान कंपन्या सेवा देणार आहेत. पहिल्याच दिवशी 30 उड्डाणं होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
बेंगळुरूहून येणारे फ्लाइट क्रमांक 6E 460 सकाळी 08.00 वाजता नवी मुंबई विमानतळावर उतरणार आहे. त्यानंतर फ्लाइट क्रमांक 6E 882 सकाळी 08.40 वाजता हैदराबादकडे रवाना होणार आहे. फेब्रुवारीपासून पूर्ण क्षमतेने उड्डाण सेवा होणार आहे.
Summary
नवी मुंबई विमानतळ आजपासून सुरू
नाताळच्या मुहूर्तावर पहिली नियमित विमानसेवा सुरू
नवी मुंबईतून पहिल्या दिवशी 30 विमानांचं उड्डाण