महाराष्ट्र

नवी मुंबई महापालिकेने केला 100 टक्के लसीकरणाचा टप्पा पार

Published by : Lokshahi News

सिद्धेश म्हात्रे
नवी मुंबई महापालिकेने आपल्या क्षेत्रातील 100 टक्के नागरिकांचे कोरोना लसीकरणाचा पहिला डोस पूर्ण केलाय.100 टक्के लसीकरण करणारी नवी मुंबई महापालिका एमएमआर क्षेत्रातील पहिली महापालिका, तर राज्यातील दुसरी महापालिका ठरली आहे.

18 वर्षांवरील 11 लाख 7 हजार 233 नागरिकांना कोव्हीड लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. दुसरा डोस ही 52 टक्के नागरिकांना देऊन झालाय. ज्या व्यक्तींचा विविध सेवा पुरवताना मोठ्या प्रमाणावर जनसंपर्क येतो असे मेडिकल स्टोअर, हॉटेल, ब्युटी पार्लर, पेट्रोल पम्प, टोल नाका तसेच घरोघरी गॅस वितरण करणारे कर्मचारी, घरकाम करणारे महिला व पुरूष कामगार, ऑटो / टॅक्सी वाहनचालक, सोसायटी वॉचमन अशा कोरोनाच्या दृष्टीने जोखमीच्या व्यक्तींकरिता विशेष लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले होते. बेघर, निराधार व्यक्ती, तृतीयपंथीय यांचेकरिता तसेच कॉरी क्षेत्र आणि रेडलाईट भागातही विशेष लसीकरण मोहीमा राबविण्यात आल्या.अंथरूणाला खिळलेल्या बेडरिडन व्यक्तींसाठी घरी जाऊन लसीकरण करण्यात आल्याने नवी मुंबई महापालिकेला 100 टक्के लसीकरणाचा टप्पा पार केला.

"एमएमआर भागातली नवी मुंबई महानगर पालिका आहे जिथे पहिला डोस 100 टक्के नागरीकांनी घेतला आहे. पालिकेचं धोरण असं होतं की फक्त स्वत:हुन लस घ्यायला येणारे नाही तर पोटेंशीयल सुपरस्प्रेडर लोकांना ओळखुन त्यांचेही लसीकरण तातडीने केलं. जरी लसीकरण चालु राहणार असलं तरी तिसऱ्या लाटेची शक्यता आहे. पण जेवढे जास्त नागरीक लस घेलील तेवढी तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी होईल." असं महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितलंय.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Shubhanshu Shukla : शुभांशू शुक्ला अखेर पृथ्वीवर परतले ; भारताची मान गर्वाने उंचावली

Latest Marathi News Update live : अंतराळवीर शुभांशू शुक्ला अखेर पृथ्वीवर परतले

Dahisar : एकसर भूखंड प्रकरण ; महापालिकेचा 349 कोटींचा भूखंड अद्यापही विकासाच्या प्रतीक्षेत

Chhatrapati Sambhajinagar : साखरपुड्यावरुन परतणाऱ्या कुटुंबावर काळाने घाला घातला! ; चिमुरडा गंभीर तर वधूला...