Navi Mumbai 
महाराष्ट्र

Navi Mumbai: नवी मुंबईतील सिंप्लेक्स सोसायटीतील रहिवासी पुनर्विकासातील दादागिरीविरोधात आक्रमक

Redevelopment Row: नवी मुंबईतील घणसोली येथील सिंप्लेक्स सोसायटीतील रहिवाशांनी पुनर्विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या दादागिरी, दबाव आणि फसवणुकीविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

Published by : Dhanshree Shintre

नवी मुंबई घणसोली सेक्टर ७ येथील सिंप्लेक्स सोसायटीतील रहिवाशांनी पुनर्विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या दादागिरी, दबाव आणि फसवणुकीविरोधात आवाज उठवला आहे. सोसायटीतील इमारती धोकादायक घोषित करण्यात आल्या असल्या तरी रहिवाशांना न्याय मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सोसायटीमध्ये सुमारे ८०० कुटुंबे राहतात. अनेक रहिवाशांना गेल्या ८ ते ९ महिन्यांपासून भाडे मिळालेले नाही. काहींची घरे जबरदस्तीने रिकामी करून घेतल्याचेही रहिवासीयांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे अनेक कुटुंबे आर्थिक अडचणीत सापडली आहेत.

IIT खडगपूर आणि VJTI मुंबई यांनी या इमारती राहण्यास अयोग्य असल्याचा अहवाल दिला आहे. तसेच PWD, कोकण आयुक्त आणि शहर अभियंता यांनीही इमारती धोकादायक असल्याचे मान्य केले आहे. मात्र, नवी मुंबई महापालिकेकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. यावेळी रहिवाशांनी विकासाला विरोध नसून अन्यायकारक पुनर्विकासाला विरोध असल्याचे स्पष्ट केले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा