Navneet - Ravi Rana  
महाराष्ट्र

Navneet Ravi Rana : राणा दाम्पत्याला सशर्त जामीन मंजूर, या आहेत अटी

Published by : Team Lokshahi

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा ()यांना जामीन मंजूर झाला आहे. खासदार नवनीत राणा यांना न्यायालयाने सशर्त जामीन दिला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने (Mumbai Sessions Court) आज हा निर्णय दिला.

या आहेत अटी

  • आता नवनीत राणा आणि रवी राणा यांना माध्यमांशी बोलण्यात मज्जाव करण्यात आला

  • पुराव्यांत छेडछाड न करण्याचीही हमी त्यांच्याकडून घेण्यात आली आहे.

  • तपास प्रभावित होईल, असं कृत्य केलं, तरी राणा दाम्पत्याला जेलची हवा खावी लागू शकते.

दरम्यान, खासदार नवनीत राणा यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना भायखळा जेलमधून जेजे हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते. १२ दिवसांनी राणा दाम्पत्यांना जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांच्या अमरावतीच्या घरी जल्लोष करण्यात आला.

राणा दाम्पत्य यांच्या जामीन अर्जावर शनिवारी झालेल्या सुनावणीत पोलिसांकडून राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जाला विरोध करताना म्हटलं होतं की देशात सद्य:स्थितीत हिंदुत्त्व हे एक मुख्य सूत्र बनले आहे आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी या सूत्राचा राजकीय हितासाठी वापर केला जात आहे. राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर शनिवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर सुनावणी झाली होती. पण जामिनाबाबतचा निर्णय त्यांनी राखून ठेवला होता.

नेमकं प्रकरण काय ?

काही दिवसांपूर्वी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं खाजगी निवासस्थान मातोश्रीबाहेर येऊन हनुमान चालिसा म्हणणार असल्याची घोषणा केली होती. त्यासाठी राणा दाम्पत्य मुंबईत दाखल झालं होतं. त्यामुळे शिवसैनिक आणि राणा दाम्पत्यांच्या यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता. शेकडो कार्यकर्ते मातोश्रीबाहेर पहारा देत होते.

यावेळी राणा दाम्पत्यांनी प्रक्षोभक विधाने करून कायदा व सुव्यवस्था बिघडवल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक झाली होती. मागील एक आठवड्याहून अधिक काळापासून राणा दाम्पत्य न्यायालयीन कोठडीत आहे. त्यांच्याविरोधात पोलिसांनी भादंवि कलम 124A नुसार राजद्रोह राज्य सरकारविरोधात प्रक्षोभक विधाने करणे आणि सरकारला आव्हान देणे आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.

समाजात दरी निर्माण करणे सरकारला आव्हान देणे यांमुळे राणा दाम्पत्यांविरोधात आम्ही 124A अंतर्गत कलम लावले असे सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सांगितले. शासन व्यवस्था कोलमडावी व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवावा या उद्देशाने राणा यांनी कृत्य केले होते त्या अर्थाने हा राजद्रोह होतो असे घरत यांनी स्पष्ट केले. आरोपींना नोटीस देऊन शांतता ठेवा परत जा असे आवाहन करण्यात आले होते. मात्र त्यांनी नोटीस मानली नाही. शिवाय शासनाला आव्हान दिले. त्यातून त्यांचा अप्रामाणिक हेतू दिसून आला असंही सरकारी वकील घरत यांनी नमूद केलं होतं.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा