महाराष्ट्र

आधी डोक्यावर घेतली बाप्पाची मूर्ती अन् मग...; नवनीत राणांच्या गणेश विसर्जनाची चर्चा

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : दहा दिवसांच्या मनोभावे पूजा केल्यानंतर भक्तांनी शुक्रवारी जड अंतकारणाने विधीवत लाडक्या बाप्पाला निरोप दिला. तर, नेतेमंडळींनीही मोठ्या थाटात गणेश विसर्जन केले. परंतु, चर्चा होतीये ती खासदार नवनीत राणा यांनी केलेल्या गणपती विसर्जनाची.

राज्यात सर्वत्र अनंत चतुर्दशीचा उत्साह असताना नवनीत राणा यांनीही बाप्पाचे विसर्जन केले. परंतु, साधारणतः गणपती विसर्जन करताना मुर्ती पाण्यात दोन ते तीन वेळा पाण्यात वरखाली केली जाते. मात्र, नवनीत राणा यांनी आधी बाप्पाची मूर्ती डोक्यावर घेतली व नंतर ही गणेश मुर्ती काही उंचीवरुन खाली फेकली. यादरम्यानचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी नवनीत राणांवर टीकेची झोड उठवली आहे. तर, विरोधकांनीही राणा दाम्पत्यावर टीकास्त्र डागले आहे. हेच का तुमचे हिंदुत्व, असा सवालही शिवसेनेच्या प्रवक्त्या सुष्मा अंधारे यांनी केला आहे. यामुळे राणा दाम्पत्य आता अडचणीत येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून नवनीत राणा यांच्या अडचणीत भर पडत आहे. हनुमान चालिसा वाचण्यावरुन आक्रमक झालेल्या नवनीत राणा यांना एका मुलाखतीत हनुमानाचा अर्थ विचारला असता त्यांना सांगता आला नव्हता. यावरुनही त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते. तर, नुकतेच अमरावतीतून एक मुलगी बेपत्ता झाल्याने याचा संबंध लव्ह जिहादशी खासदार नवनीत राणा यांनी जोडला होता. परंतु, मुलीने माध्यमांसमोर येत नवनीत राणा बोलत आहे ते पूर्ण खोट आहे, असा खुलासा केला होता.

"दहशतवाद्यांनी हल्ला केल्यावर काँग्रेस जगाला सांगत होतं, आम्हाला वाचवा...वाचवा"; PM मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

खासदार श्रीकांत शिंदेंचं मोठं विधान, पत्रकार परिषदेत म्हणाले; "कोल्हापूरमध्ये महापूरावर नियंत्रण ठेवण्यासाठी..."

Devendra Fadnavis : पुन्हा एकदा माढा मतदारसंघातून रणजितसिंह नाईक निंबाळकरच निवडून येणार

"काँग्रेसच्या राज्यात ६० वर्ष कुणाचाच आवाज नव्हता, पण मोदींनी...", खुद्द पंतप्रधानांनी स्पष्टच सांगितलं

Ravindra Waikar: अमोल कीर्तीकर यांच्या विरोधात उत्तर पश्चिम मुंबईतून रवींद्र वायकरांना शिवसेनेची उमेदवारी