(Navneet Rana) भाजप नेत्या नवनीत राणा यांना पाकिस्तानातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या तणावाचे वातावरण असून यातच भारतीय जनता पक्षाच्या नेत्या नवनीत राणा यांना पाकिस्तानमधून धमकीचा कॉल आल्याने आता मोठी खळबळ उडाली आहे.
"हिंदू शेरनी हनुमान चालीसा पढने वाली थोडे दिन की मेहमान.. जल्दी उडाने वाले है." असे म्हणत धमकीचा कॉल आल्याची माहिती मिळत आहे.
याप्रकरणी नवनीत राणा यांनी खार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून संबंधित धमकी कॉल्सबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. पोलिसांकडून याचा तपास सुरू आहे.