(Navneet Rana) अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
याआधी अनेक वेळा धमक्या देण्यात आलेल्या आहेत. याप्रकरणी अमरावतीच्या राजापेठ पोलिसात युवकावर पुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवनीत राणा तू जातीवाचक बोलू नको, या हिंदुस्तानमध्ये सर्व एकत्रच आहे, खूप वाईट होईल. असे म्हणत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरु केला आहे.पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल केला आहे. नवनीत राणा यांना धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.