मुंबई : खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना खार पोलिसांनी अटक केली आहे. कलम 153 (A) अंतर्गत त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
'मातोश्री'समोर हनुमान चालिसा (hanuman chalisa) पठण करण्याची भूमिका राणा दाम्पत्याने (Navneet Rana) मागे घेतली. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याचं कारण देत आपण हे आंदोलन मागे घेतल्याची घोषणा राणा दाम्पत्यांने केली. यानंतर सुद्धा शिवसेना आक्रमक झाली होती. त्यांनी त्यांच्या खार मधल्या घराबाहेर गर्दी केली होती. तसेच राणा दाम्पत्यांनी माफी मागावी अशा घोषणा दिल्या होत्या.
दरम्यान खार पोलीसांनी राणा दाम्पत्याची घरी पोहोचत त्यांना अटक केली. चिथावणीखोर वक्तव्य प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली आहे. उद्या राणा दाम्पत्याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे.