थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(NCP) आगामी महापालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. काल एबी फॉर्मचं वाटप करण्यात आले. अनेकांना उमेदवारी नाकारल्याने इच्छुकांनी नाराजी व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले.
यातच आतच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सर्वाधिक 52 लाडक्या बहिणींना उमेदवारी देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी अजित पवार गटाकडून 94 उमेदवार देण्यात आले असून ते मुंबईत स्वबळावर लढणार आहेत.
यात 52 महिला उमेदवार असून सर्वाधिक महिलांना उमेदवारी देणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठरला आहे. येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.
Summery
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सर्वाधिक ५२ लाडक्या बहिणींना उमेदवारी
अजित पवार गटाकडून ९४ उमेदवार देण्यात आले
सर्वाधिक महिलांना उमेदवारी देणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठरला आहे