बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Nanded ) राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस जीवन पाटील घोगरे यांच्यावर जीवघेणा हल्ला करत त्यांचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या गाडीसमोर स्वतःची गाडी आडवी लावत घोगरे पाटील यांना गाडी बाहेर काढून बेदम मारहाण करत स्वतःच्या गाडीतून त्यांना घेऊन गेल्याचा प्रकार समोर आला आहे.
काही वेळानंतर घोगरे यांना अज्ञातस्थळी सोडून देण्यात आले. त्यानंतर घोगरे यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तसेच हा हल्ला वैयक्तिक कारणावरून नसून राजकीय हेतूने झाला असल्याचे सांगितले.
Summary
नांदेडमध्ये राष्ट्रवादीच्या सरचिटणीसांचं अपहरण
जीवन घोगरे पाटील यांच्यावर हल्ला करुन केलं अपहरण
काही तासात अज्ञातस्थळी मारहाण करून दिले सोडून