महाराष्ट्र

शरद पवारांची ‘ती’ कृती; सोशल मीडियावर एकच चर्चा

Published by : left

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आपल्या राजकीय भुमिकेने नेहमीच चर्चेत असतात. एका दगडात तीन पक्षी कसे मारतात, अशा प्रकारची टीका ते राजकारणात करत असतात, त्यांच्या टीकेचे एक अर्थ निघतात. राजकारणात सोबतच ते सोशल मीडियावर सुद्धा चर्चेचा विषय ठरत असतात.यावेळी सुद्धा त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर (social media) व्हायरल (Photo viral) झाला असून या फोटोची एकच चर्चा रंगली आहे.

सोशल मीडियावर (social media) सध्या शरद पवारांचा (Sharad Pawar) एक फोटो व्हायरल (Photo viral) होत आहे, हा फोटो विमानतळावरील आहे. यामध्ये ते फ्लाईटच्या बोर्डिंगवेळी सामान्य प्रवाशाप्रमाणे रांगेत उभे असल्याचे दिसत आहे. खरतर शरद पवार आज सकाळी मुंबईहून दिल्लीला जाण्यासाठी निघाले होते. यावेळी मुंबई विमानतळावर पोहचताच त्यांनी कुठचाही बडेजावपणा न दाखवता सामान्य प्रवाशाप्रमाणे रांगेत उभं राहत विमानात प्रवेश केला.

विशेष म्हणजे व्हीआयपी व्यक्तींना सामान्य प्रवाशांप्रमाणे रांगेत उभे न राहता व्हीआयपी प्रवास करता येतो. मात्र हा व्हीआयपी प्रवास टाळत त्यांनी सामान्य प्रवाशाप्रमाणे रांगेत उभं राहत विमान प्रवास करणे पसंत केले. या संदर्भातला सामान्य प्रवाशांप्रमाणे प्रवास करत असल्याचा फोटो आता व्हायरल झाला आहे. या फोटोत त्यांचा साधेपणाने दिसून येत असल्याचे नेटकरी सांगत आहेत, तर काही नेटकरी टीकाही करत आहेत.

मेट्रोतूनही सामान्य प्रवाशाप्रमाणे प्रवास

याआधी पुण्यातही शरद पवार (Sharad Pawar) यांचे प्रवासी रुप पुण्यात पाहायला मिळाले. ते अचानक पिंपरी चिंचवडमधील फुगेवाडी स्टेशनवर पोहोचले आणि काही समर्थकांसह त्यांनी मेट्रो ट्रेनमध्ये प्रवास केला. विशेष म्हणजे पवारांनीही रांगेत थांबून तिकीट खरेदी केले. 31 जानेवारीपासून पिंपरी ते फुगेवाडी दरम्यान मेट्रो ट्रेन सुरू होणार आहे. याआधी शरद पवार (Sharad Pawar) यांनी ही अचानक भेट देऊन लोकांना जागरुक केले आहे.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुखांनी मेट्रो अधिकाऱ्यांची भेट घेऊन प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेतला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Bigg Boss 19 : ‘बिग बॉस 19’ची जोरदार सुरुवात; पाहा घरातील 16 स्पर्धकांची यादी!

Ganesh Chaturthi 2025 : गणेश चतुर्थीला 21 मोदकांसह 21 पानांचही आहे विशेष महत्त्व! पत्र पूजा म्हणजे काय? जाणून घ्या महत्त्व

Latest Marathi News Update live : रायगडमध्ये वाहतूक नियंत्रणासाठी AIचा वापर

Latest Marathi News Update live : लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे आज लालबागच्या राजाचे प्रथम दर्शन