पूरग्रस्तांसंदर्भातील आदेश आठ दिवसात मागे घ्यावा, या मागणीसाठी शेट्टींच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी कोल्हापुरात आक्रोश मोर्चा काढला. काही चुका झाल्या असतील अथवा पूरग्रस्तांना मदत पोहोचली नसेल, तर पालकमंत्री अथवा विभागीय आयुक्तांकडे त्यांनी तपशील द्यावा. मी विभागीय आयुक्तांना निर्देश देऊन योग्य ती अंमलबजावणी करायच्या सूचना देईन, असं म्हणत राजू शेट्टींनी आक्रमकपणा टाळावा, असा सल्ला निलम गोऱ्हे यांनी दिला आहे.
कडकनाथच्या कोंबड्या रस्त्यावर टाकण्याऐवजी आणि टाकून चढून बसण्याऐवजी तपशील द्यावा, असा सल्ला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींना उपसभापती निलम गोऱ्हेंना दिला.
केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा बंगला अनधिकृत आहे असं सूचित करत उपसभापती निलम गोऱ्हेंनी भाजप नेते किरीट सोमय्यांनी हे प्रकरण बाहेर काढावे असं आवाहन केलंय. शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकरांच्या अनधिकृत बंगल्याचा संदर्भ देताना गोऱ्हेंनी राणे आणि सोमय्यांवर तोंडसुख घेतलं.
ठाकरे कुटुंबियांवर टीका करणं हीच नारायण राणेंची रोजीरोटी आहे. बांधकाम मजूर, रिक्षाचालक या कामगारांमध्ये नारायण राणे या कामगारांचा समावेश झालाय. ज्यांची रोजीरोटी ठाकरे कुटुंबीयांवर अवलंबून आहे,असे गोऱ्हे म्हणाल्या.