महाराष्ट्र

Netaji Subhas Chandra Bose Jayanti: पंतप्रधान आज नेताजींच्या पुतळ्याचे करणार इंडिया गेटवर अनावरण

Published by : Lokshahi News

स्वातंत्र्यसैनिक  नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज जयंती आहे. त्याच्या स्मरणार्थ कृतज्ञता म्हणून हा दिवस दरवर्षी 'पराक्रम दिवस' म्हणून साजरा केला जातो. नेताजी यांच्या जयंतीनिमित्त संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये  त्यांना पुष्पांजली अर्पण करण्यात येणार आहे. हा पुष्पहार अर्पण समारंभ 23 जानेवारी रोजी सकाळी 10.30 वाजता संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये होणार आहे.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी कटक, ओडिशा, बंगाल विभागात झाला.दिल्लीतील इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा भव्य पुतळा बसवण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेताजींच्या पुतळ्याचे छायाचित्र ट्विट करून ही माहिती दिली. जोपर्यंत नेताजी बोस यांचा भव्य पुतळा तयार होत नाही तोपर्यंत त्यांचा होलोग्राम पुतळा त्याच ठिकाणी उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. 23 जानेवारी रोजी नेताजींच्या जयंतीदिनी मी होलोग्राम पुतळ्याचे अनावरण करणार.

होलोग्राम म्हणजे काय? 

होलोग्राफिक हा डिजिटल तंत्रज्ञानाचा एक प्रकार आहे. हे प्रोजेक्टरसारखे काम करते, ज्यामध्ये कोणत्याही गोष्टीला 3D आकार दिला जाऊ शकतो. या तंत्रामुळे असे वाटते की आपल्या समोरची गोष्ट खरी आहे, परंतु ती फक्त 3D डिजिटल प्रतिमा आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा