महाराष्ट्र

1 डिसेंबरपासून गॅस सिलेंडर ते होम लोनमध्ये मोठे बदल

Published by : Lokshahi News

प्रत्येक नवीन महिन्याच्या पहिल्या दिवशी काही नवीन नियम लागू होतात किंवा जुन्या नियमांमध्ये काही बदल होतात. नोव्हेंबर महिना संपत आला असून 3 दिवसांनी नवा महिना सुरू होणार आहे. 1 डिसेंबरलाही काही नवे नियम लागू होणारा आहे.

गॅस सिलेंडरची किंमत

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलिंडरच्या किमतीचा आढावा घेतला जातो. त्यानंतर त्याचे नवीन दर निश्चित केले जातात. व्यावसायिक आणि घरगुती सिलिंडरचे नवीन दर प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला जारी केले जातात .

होम लोन ऑफर

सणासुदीच्या काळात बहुतांश बँका वेगवेगळ्या होम लोनच्या ऑफर देत असतात. यापैकी अनेकांमध्ये कमी व्याजदर आणि जीरो प्रोसेसिंग फीस चा देखील समावेश असतो. पण, बहुतेक बँकांच्या ऑफर 31 डिसेंबर ला संपतात. पण एलआयसी हाऊसिंग फायनान्सची ऑफर 30 नोव्हेंबरला संपते .

एसबीआय क्रेडिट कार्ड

तुम्ही SBI क्रेडिट कार्ड वापरत असाल तर 1 डिसेंबरपासून SBI क्रेडिट कार्डने EMI वर शॉपिंग करणे महागणार आहे. सध्या, SBI कार्ड वापरण्यासाठी फक्त व्याज द्यावे लागते, परंतु 1 डिसेंबरपासून प्रोसेसिंग फी देखील आकारले जाईल.

आधार लिंकिंग

तुम्ही जर नोकरी करत असाल आणि तुमच्याकडे UAN म्हणजेच युनिव्हर्सल अकाउंट नंबर असेल, तर 30 नोव्हेंबरपर्यंत आधारशी लिंक करा. 1 डिसेंबर पासून, कंपन्यांना फक्त UAN आणि आधार लिंक असलेल्या कर्मचाऱ्यांचेच ECR म्हणजे इलेक्ट्रॉनिक चलन कम रिटर्न भरण्यास सांगितले आहे. याचा अर्थ असा की जर एखाद्या कर्मचाऱ्याचा UAN आधार पडताळला नसेल, तर ECR दाखल केला जाणार नाही आणि अशा परिस्थितीत, कर्मचाऱ्याकडून पीएफमध्ये मिळणारे योगदान थांबवले जाऊ शकते.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा