Newborn Baby  Team Lokshahi
महाराष्ट्र

Watch Video; पुणे तिथे काय उणे?; थेट हेलिकॉप्टरमधून आणलं नवजात बाळाला घरी

मुलगी झाल्याचा अनोख्या पद्धतीन आनंद साजरा करण्यात आला.

Published by : left

अमोल धर्माधिकारी |

मुलगी झाल्याचा (Girl Child) आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आतापर्यत घोड्यावरून साखर वाटणे, फुलाच्या पायघड्या घालून अथवा वाजत गाजत स्वागत केल्याचे आपण पाहिले असेलच, मात्र पुण्यात थेट हेलिकॉप्टरमधून (Helicopter) नवजात बाळाला घरी आणतं मुलगी झाल्याचा (Newborn Baby) आनंद साजरा करण्यात आला आहे.

पुण्यातील खेड तालुक्यातील शेलगाव येथे नुकताच एका मुलीचा (Newborn Baby) जन्म झाला. मुलगी झाल्याचा (Girl Child) आनंद साजरा करण्यासाठी चक्क तिला थेट हेलिकॉप्टरमधून वडिलांनी घरी आणले आहे. तसेच राजलक्ष्मीच्या स्वागतासाठी फुलांच्या पायघड्याही घालण्यात आल्या होत्या.

अॅड.विशाल झरेकर यांना कन्यारत्न (Girl Child) झाल्यानंतर त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. यामुळे मुलगी झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी त्यांनी थेट हेलिकॉप्टरमधून (Helicopter) नवजात बाळाला घरी आणल. झरेकर यांनी चिमुकलीला आपल्या हातात घेत हेलिकॉप्टरमधून (Helicopter) खाली उतरत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. दरम्यान समाजानं स्त्री जन्माचं स्वागत करावं आणि मुलींकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलावा, यासाठी हा कुटूंबियांचा प्रयत्न दिसतोय.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा