महाराष्ट्र

‘डॉक्टर डे’ च्या दिवशी पुण्यात नवविवाहित डॉक्टर दांपत्याची आत्महत्या

Published by : Lokshahi News

चंद्रशेखर भांगे | देशभरात एकीकडे आज डॉक्टर डे साजरा करत डॉक्टरांच्या कार्याचे कौतुक होत असतानाच दुसरीकडे पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यात नवविवाहित डॉक्टर दांपत्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने पुणे हळहळल आहे.

पुण्याच्या आझादनगरमध्ये नवविवाहित दांपत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. निखिल शेंडकर (27) आणि अंकिता निखिल शेंडकर (26) असे आत्महत्या केलेल्या डॉक्टर दाम्पत्याचे नाव आहे. नवरा-बायकोत झालेल्या किरकोळ वादामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती आहे.

दरम्यान एकीकडे डॉक्टर दिवस असल्याने डॉक्टरांप्रती सन्मान व्यक्त केला जात असतानाच अशाप्रकारे दुःखद घटना झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. वानवडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा