पंधरा दिवसांच्या लॉकडाऊनसाठी राज्यसरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे. कोरोनाचा संसर्ग कमी होत नसल्याने यासंदर्भात पावलं उचलण्यात आली असून यापुढे अत्यावश्यक सेवा सकाळी ७ ते सकाळी ११ वाजेपर्यंतच सुरू राहणार आहेत. कोरोनाचा झपाट्याने वाढणारा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी आज मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडत आहे. त्याआधी शासनाने कडक नियमावली जाहीर केलीय.
काय आहे नव्या नियमावलीत?
सर्व अत्यावश्यक सेवांना सकाळी ७ ते सकाळी ११ पर्यंतच परवानगी
किराणा, भाजी, फळविक्रेते, मटण-चिकन शॉप्सचा समावेश
पोल्ट्री, डेअरी, बेकरी, मिठाई, पावसाळ्याशी संबंधित वस्तू
मासेविक्री, पाळीव प्राण्यांच्या खाद्य दुकानांवर वेळेची मर्यादा
पेट्रोल पंपावर देखील वेळेचे निर्बंध
गॅस भरण्याची सेवा याच वेळेत सुरू राहणार
कृषी उत्पादनांचा ७ ते ११ वेळेत समावेश