थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली Scoll करा...
(NIA Raid) नवी दिल्लीमध्ये लाल किल्ला मेट्रो स्टेशन गेट क्रमांक 1 जवळ पार्किंगमध्ये स्फोट झाला. या स्फोटानंतर अनेक गाड्यांना आग लागली. हा स्फोट एवढा मोठा होता की, आजूबाजूच्या दुकानांच्या काचाही फुटल्या.
या स्फोटात सुमारे 8 जणांचा मृत्यू झाला असून, 20 हून अधिक लोक जखमी झाले. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. लाल किल्ला परिसरात मेट्रोच्या गेट क्रमांक एकवर एक कार उभी होती. याच कारमध्ये हा स्फोट झालेला आहे.
या स्फोटामुळे आजूबाजूच्या तीन गाड्यांना आग लागल्याची घटना घडली. याच दिल्ली स्फोटाच्या घटनेनंतर खळबळ उडाली असतानाचा आता NIA ने बुधवारी देशातील 5 राज्यांमध्ये मोठी कारवाई करत 10 वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले.
बांगलादेशी अवैध स्थलांतरितांशी जोडल्या गेलेल्या 'अल-कायदा गुजरात टेरर प्लॉट' प्रकरणी ही धडक कारवाई करण्यात आली अूसन पश्चिम बंगाल, त्रिपुरा, मेघालय, हरियाणा आणि गुजरात या राज्यांमध्ये संशयित आणि त्यांच्या साथीदारांशी संबंधित ठिकाणांची कसून तपासणी NIAच्या पथकांनी केली आहे.
Summery
NIAची बुधवारी देशातील 5 राज्यांमध्ये मोठी कारवाई
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल असल्याचा संशय
NIA चे दिल्ली स्फोटानंतर 10 ठिकाणी छापे