महाराष्ट्र

सचिन वाझेसह रियाझ काझीचा जामीन अर्ज फेटाळला

Published by : Lokshahi News

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थाना बाहेरील स्फोटकं आणि मनसुख हिरेन हत्याकांड प्रकरणात अटकेत असलेल्या सहायक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वाझे आणि रियाझ काझी या पोलीस अधिका-यांनी दाखल केलेला डीफॉल्ट जामीन अर्ज कोर्टानं फेटाळून लावला. तसेच या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यासाठी आणखी 30 दिवसांचा अवधी देण्याची एनआयएची मागणीही न्यायालयानं मान्य केली आहे. यासह विशेष एनआयए कोर्टानं तपास यंत्रणेला मोठा दिलासा दिला.

मुकेश अंबानी यांच्या 'अँटिलिया' या निवासस्थानाबाहेर जिलेटिनच्या 20 कांड्या आणि धमकीचं पत्र ठेवलेली स्कॉर्पिओ गाडी बेवारस सोडण्यात आली होती. या घटनेत काही दिवसांतच त्या गाडीचा मालक मनसुख हिरेनच्या अनाचक मृत्यूप्रकरणी गुन्हे शाखेचे सहायक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वाझे, त्यांचा सहकारी रियाझ काझी यांना एनआयएकडून अटक करण्यात आली होती. तपासयंत्रणांना कोणत्याही प्रकरणात 90 दिवसांत आरोपपत्र दाखल करणं बंधनकारक असतं. मात्र तपासयंत्रणा इथं यात अपयशी ठरल्यामुळे आपल्याला डीफॉल्ट जामीन देण्यात यावा, अशी मागणी करत सचिन वाझेसह अन्य दोन पोलीस अधिका-यांनी विशेष न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र हा जामीन अर्ज कोर्टानं फेटाळून लावला. तसेच या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यासाठी आणखी 30 दिवसांचा अवधी देण्याची एनआयएची मागणीही न्यायालयानं मान्य केली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा