बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
( Nilesh Rane ) महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये मालवण नगर परिषदेत शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ममता वराडकर यांनी भाजपच्या शिल्पा खोत यांचा पराभव केला.
याच पार्श्वभूमीवर आता कोकणातील विजयानंतर निलेश राणे यांना शिवसेनेत मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबई महानगर पालिकेसाठी निलेश राणेंवर मोठी जबाबदारी देण्यात येणार असून ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात निलेश राणेंवर ही मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. लवकरच शिवसेनेचे स्टार प्रचारक जाहीर होणार असून त्यामध्ये निलेश राणे स्टार प्रचारक असणार असल्याची माहिती मिळत आहे.
Summary
मुंबई महानगर पालिकेसाठी निलेश राणेंवर मोठी जबाबदारी?
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात निलेश राणेंवर मोठी जवाबदारी?
लवकरच शिवसेनेचे स्टार प्रचारक जाहीर होणार