थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
( Nilesh Rane - Ravindra Chavan ) गेल्या काही दिवसांपासून भाजपा आणि शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांच्यातील संघर्ष पाहायला मिळत आहे. निलेश राणे आणि रवींद्र चव्हाण यांच्यात आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळाले.
मालवणमधील नगरपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी मालवणमधील भाजपाचे पदाधिकारी विजय किनवडेकर यांच्या राहत्या घरी धाड टाकली. त्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आणि त्यावर अनेक प्रतिक्रिया देखील आल्या.
याच पार्श्वभूमीवर आता आज नागपूरमध्ये सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनातरवींद्र चव्हाण आणि निलेश राणे यांच्यात भेट झाली. विधिमंडळ परिसरात निलेश राणे-रवींद्र चव्हाण यांची भेट झाली असून 'माझा लढा व्यक्तीविरोधात नव्हता, तर व्यवस्थेविरोधात होता. असे वक्तव्य त्यावेळी निलेश राणे यांनी केलं.
Summery
विधिमंडळ परिसरात निलेश राणे-रवींद्र चव्हाणांची भेट
विधिमंडळ परिसरात निलेश राणे-रवींद्र चव्हाणांची भेट
'माझा लढा व्यक्तीविरोधात नव्हता, तर व्यवस्थेविरोधात होता, निलेश राणेंचं वक्तव्य