थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
( Nitesh Rane) महापालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.
अनेक पक्ष जोरदार प्रचाराला लागले असून सभा, रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. सभांचा धडाका पाहायला मिळत असून याच पार्श्वभूमीवर आज आदित्य ठाकरे यांच्या बालेकिल्ल्यात नितेश राणे यांची सभा होणार आहे. त्यामुळे आता वरळीतील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे.
मंत्री नितेश राणे आज सायंकाळी 6 वाजता वरळीत येणार असून वरळी बीडीडी चाळ येथे राणे प्रचार करणार आहेत. त्यामुळे आता या सभेतून नितेश राणे कोणावर निशाणा साधणार हे पाहणं महत्त्वाचे आहे.
Summary
आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात आज मंत्री नितेश राणेंची तोफ धडाडणार
मंत्री नितेश राणे आज सायंकाळी 6 वाजता वरळीत
वरळी बीडीडी चाळ येथे राणे करणार प्रचार