महाराष्ट्र

ईडीकडून सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला नोटीस नाही

Published by : Lokshahi News

जरंडेश्वर साखर कारखाना कर्ज प्रकरणी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला ईडीने कुठल्याही प्रकारची नोटीस बजावली नाही. त्यामुळे ठेवीदारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी केले आहे. या संदर्भातले प्रसिद्धीपत्रकही त्यांनी काढले आहे.

जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना लि.चिमणगांव, ता. कोरेगांव जि. सातारा हा कारखाना महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि.मुंबई यांनी कर्ज थकित झाल्याने कर्जाचे वसुलीसाठी सिक्युरिटायझेशन अँक्टअंतर्गत जप्त करून सदर कारखान्याचा जाहीर लिलाव केला. सदर लिलाव विक्री प्रक्रियेत मे. गुरू कमोडिटीज सर्व्हिसेस प्रा. लि., मुंबई यांच्याकडून 25 नोव्हेंबर 2010 रोजी खरेदी केलेला आहे. हा कारखाना खरेदीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने थेट अगर सहभागातून कोणेताही कर्ज पुरवठा केला नसल्याचे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी सांगितले.
मे. गुरू कमोडिटीज सर्व्हिसेस प्रा. लि., मुंबई या कंपनीकडून सदरचा कारखाना जरंडेश्वर शुगर मिल्स,पुणे या प्रायव्हेट कंपनीस कारखाना चालविण्यासाठी करार पध्दतीने दिला. सदरच्या कारखान्याची क्षमता २५००मे.टन प्रतिदिन होती ती वाढून ७००० मे.टन प्रतिदिन करण्यासाठीचा प्रस्ताव प्रकल्प मशिनरी आधुनिकरण व सहविज निर्मिती करण्यासाठी सहभागातून 'कर्ज मिळण्यासाठी बँकेकडे दि.१४/०३/२०१७ अन्वये कर्ज मागणी केलेली होती.त्यानुसार सदर कारखान्यास सन २०१७-१८ या आर्थिक वर्षापासून पुणे जिम,सह बँकेच्या सहभागातून व त्यांच्या मार्फत वितरीत केलेले आहे. या सहभागामध्ये पुणे, सातारा, रत्नागिरी जि.म.सह बँक आणि कराड अर्बन यांचा सहभाग आहे. बँकेने मशिनरी आधुनिकीकरण व सहविज निर्मीती व इथेनॉल प्रकल्पासाठी कर्जपुरवठा केलेला आहे. बँकेने वितरीत केलेल्या सर्व प्रकारच्या वसुली अत्यंत चांगल्या प्रकारे सुरू आहे. बँकेने दिलेल्या कर्जासाठी पुरेसे तारण घेण्यात आलेले असून जून २०२१ अखेर कर्जाची वसुली नियमित सुरू आहे.

अंमलबजावणी संचनालयाने (ED) या संबंधाने बँकेकडे माहिती मागविली असून बँकेवर कोणत्याही प्रकारे नोटीस बजावणी केलेली नाही. सद्या राजकीय विरोधकांकडून हेतूपुरस्कर ठेवीदारांमध्ये संभ्रम निर्माण करून माझी व बँकेची बदनामकारक माहिती सोशल मिडीयाद्वारे प्रसिध्द केली जाते. बँकेच्या ठेवीदारांनी अशा कोणत्याही बातमीवर विश्वास ठेवू नये. आपल्या सर्वांच्या ठेवी या बँकेत सुरक्षित असल्याची ग्वाही मी देत असल्याचे सतिश सावंत यांनी सांगितले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा