थोडक्यात
जालन्यात ओबीसींच्या वतीने आज मोर्चाचं आयोजन
'ओबीसी आरक्षणात होणारी घुसखोरी थांबवा'
सकल ओबीसी समाजाची मागणी
(Jalna OBC Morcha ) जालन्यात ओबीसींच्या वतीने आज मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. 'ओबीसी आरक्षणात होणारी घुसखोरी थांबवा' अशी सकल ओबीसी समाजाकडून मागणी करण्यात येत आहे. सकाळी 11 वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे.
या मोर्चात लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे उपस्थित राहणार आहेत. जालना ओबीसी आरक्षणात होणारी घुसखोरी थांबवा या मागणीसाठी जालन्यात ओबीसी च्या वतीने मोर्चाचा आयोजन करण्यात आला आहे.
जालना शहरातून या मोर्चाला सकाळी 11 वाजता सुरुवात होणार असून, त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथे या मोर्चाचे रूपांतर सभेत होणार आहे. या मोर्चाला वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची देखील उपस्थिती असणार आहे.