थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Manmad Counting Center ) राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी झालेल्या मतदानाचा आज निकाल येणार आहे. सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. 02 डिसेंबर 2025 रोजी 263 नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी मतदान झाले. सुरुवातीला पोस्टल मतदानाची मते मोजली जातील आणि त्यानंतर ईव्हीएममधील मतांची मोजणी सुरू होईल.
यातच आता मनमाड मतमोजणी केंद्रावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला मोबाईल घेऊन जाण्यास आक्षेप घेण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाचे थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रवीण नाईक यांनी आक्षेप घेतला.
मोबाईलवरून EVM मशीनमध्ये छेडछाड होण्याची भिती व्यक्त केली असून निवडणूक निर्णय अधिकारी नितीन सदागिर यांना जाब विचारण्यात आला. जामर लावला नाही तर मोबाईलची गरज काय असा जाब विचारण्यात आला. आक्षेप असेल मोबाईल मतमोजणी केंद्रात नेणार नाही असे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले.
Summery
मनमाड मतमोजणी केंद्रावर मोबाईल नेण्यास आक्षेप
निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला मोबाईल घेऊन जाण्यास आक्षेप
मोबाईलवरून EVM मशिनमध्ये छेडछाड होण्याची भीती