18 व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन सुरु आहे. लोकसभा अध्यक्षपदासाठी आज निवडणूक झाली. या निवडणुकीसाठी भाजपकडून ओम बिर्ला तर काँग्रेसकडून के सुरेश रिंगणात उतरले होते. याच पार्श्वभूमीवर आता लोकसभा अध्यक्ष म्हणून ओम बिर्ला यांची निवड करण्यात आली आहे. आवाजी मतदानाने ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
47 वर्षांनंतर प्रथमच अध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडली. ओम बिर्ला यांच्या अध्यक्षपदाला 13 पक्षांनी समर्थन दिलं. सलग दुसऱ्यांदा ओम बिर्ला यांची निवड करण्यात आली.